एक नजर उद्योग वृत्तपत्रावर!
आज बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या मॉर्निंग शो मध्ये बातमी दिली आहे की, एक्सिस बँकेने सिटी बँकेचा भारतातील ग्राहक उद्योग रु. १२,३२५ कोटी ला विकत घेतला आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्स ने आपल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, नवीन आर्थिक वर्षासाठी काही संकल्प आवश्यक आहेत.
पेट्रोल, डिझेल आणखी महागले अशी ठळक बातमी मिंट या इंग्रजी उद्योग वृत्तपत्राने दिली आहे.
फायनान्सीयल एक्स्प्रेसने म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज, एक्सिस बँक, ओएनजीसी, भारती एअर टेल, व्होडा फोन आयडिया, टाटा स्टील, स्पाईस जेट यांचे शेअर प्रकाश झोतात!
फोर्ब्ज या आंतरराष्ट्रीय उद्योग नियतकालीकाने २०२२ ची हॉंग कॉंग च्या ५० सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित केली आहे. या यादीत उद्योजक ली का-शिंग यांना पहिले स्थान दिले आहे.
फोर्ब्जच्या भारतीय आवृत्तीत बोस्टन रिपोर्टचा संदर्भ देत म्हटले आहे आहे की, भारतात साधारण ८० टक्के ओटीटी दर्शक हे लहान शहरे व ग्रामीण भागातील आहेत. रिपोर्टनुसार २०२३ पर्यंत भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचे मार्केट ५ बिलियन डॉलर (रु. ३८० अब्ज) पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.





0 Comments